अंबाजोगाई अशोक दळवे :-
बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांनी शांतता आणि सलोखा कायम ठेवावा, यासाठी अंबाजोगाई शहर कोतवाली पोलिसांच्या वतीने शहरातील विविध भागांत रूट मार्च काढण्यात आला.

पोलीस अधीक्षक नवनित काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके व सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद जोंगदंड यांच्या नेतृत्वात हा रूट मार्च पार पडला.

या रूट मार्चमध्ये पोलीस उपनिरीक्षक बालासाहेब फड , पोलीस कर्मचारी पांडुरंग काळे, हनुमंत चादर, प्रविणकुमार गित्ते, सुशांत गायकवाड, भागवत नागरगोजे तसेच हवालदार विजयसिंग गायकवाड यांनी सहभाग घेतला.
शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या रूट मार्चद्वारे नागरिकांना शांतता, बंधुता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यात आले. बकरी ईद सण शांततापूर्ण वातावरणात साजरा करण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
